काँग्रेसच्या माजी आमदारांच्या गावात भाजपाचे कमळ फुलले

in #steem2 years ago

image.png
रेणापूर (लातूर) : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी विद्यमान सरपंच, प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसचे माजी आ. त्र्यंबक भिसे यांच्या भोकरंबा गावात भाजपाचे कमळ फुलले आहे. भाजपाचे माजी सभापती अनिल भिसे यांच्या पॅनलने सत्ता काबीज केली आहे.

मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर मतमोजणीस सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच विजयींचा जल्लोष सुरु होता. सरपंचपदाचे विजयी उमेदवार- पोहरेगाव- ज्योती बालकिशन मोरे, चाडगाव- मंदा लक्ष्मण कांबळे, भोकरंबा- राजू व्यंकटराव हाके, कामखेडा- राजकुमार गोपाळ सूर्यवंशी, आसराचीवाडी- अरुणाबाई हाके, कारेपूर- प्रवीण माने, कोष्टगाव- सुंदर कोंडिबा घुले, गरसुळी- अजय राठोड, गोढाळा- मिना त्र्यंबक भताने, घनसरगाव- महानंदा शरद दरेकर, मुरढव- लक्ष्मण यादव, जवळगा- संगीता सूर्यकांत बनसोडे, सेलू (खु.)- अर्चना नामदेव बोंबडे, हारवाडी- यशोदा मुरलीधर कातपूरे, दर्जी बोरगाव- रमेश कटके, आरजखेडा - कुलदीप सूर्यवंशी, इंदरठाणा- अविनाश रणदिवे, कोळगाव- चंद्रकांत मस्के, धवेली- अंजना लिंबराज मेकले, सय्यदपूर- पद्मा धर्मराज राजमाने, लखमापूर- संध्या रमेश खाडप, माणूसमारवाडी (गोविंदनगर) - नीता पंडित शिंदे, डिघोळ देशमुख- अजिंक्य कदम, सुमठाणा- शालू बाबू शिंदे, मोटेगाव- धनंजय पवार, वांगदरी- विजय गंभीरे, शेरा- बेबीसरोजा बालासाहेब भुरे, ईटी नागापूर- इंदुबाई कल्याणराव जगदाळे, समसापूर- उज्ज्वला महादेव बरिदे, टाकळगाव- उषा आश्रुबा चोरमले, निवाडा- वंदना दामोदर साळुंके, सांगवी- पार्वती महादेव बनसोडे, यशवंतवाडी- ओम चव्हाण हे विजयी झाले आहेत.

आरजखेड्याचे सरपंचपद शिवसेनेच्या शिंदे गटाकडे...तालुक्यातील ३३ पैकी १८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. १० ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. आरजखेडा येथील सरपंच पद हे शिवसेना (शिंदे गट) ने मिळविले आहे. सांगवीत सरपंच पदासाठी चुलत सासू व सुनेत लढत झाली. त्यात सासुने सुनेचा पराभव केला. इंदरठाणा येथे पती व पत्नी हे दोघेही निवडून आले. वांगदरीत सदस्य पदासाठीचे हिम्मत कराड व संगीता विठ्ठल कराड यांना २०९ अशी समान मते पडली. त्यामुळे कार्तिक गायकवाड चार वर्षीय मुलाच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली असता हिम्मत कराड यांना नशीबाने कौल दिला.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोहरेगावातील निवडणुकीत रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. डिघोळ देशमुखमध्ये मनसे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे यांचा पराभव झाला. कामखेडा, पोहरेगाव, भोकरंबा यासह बहुतांश गावात सत्ता परिवर्तन झाल्याचे दिसून आले.

Coin Marketplace

STEEM 0.17
TRX 0.15
JST 0.028
BTC 57651.10
ETH 2377.43
USDT 1.00
SBD 2.42