शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरची नवी रहस्यं कोणती आहेत?

in #shivaji2 years ago

रायगड किल्ल्यावर 300 पेक्षा अधिक वाडे होते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. इतिहासाच्या पुस्तकांत तसं कधीच वाचलं नाही. पण ही माहिती शंभर टक्के खरी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662मध्ये राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली होती. याच रायगडावर 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. पुढे मुगल, पेशवे आणि नंतर ब्रिटीशांकडे होता. महात्मा जोतिबा फुले आणि नंतर लोकमान्य टिळक यांनी रायगडला भेट दिल्याचे उल्लेख सापडतात. अशा या ऐतिहासिक किल्ल्याचं रहस्य उलगडण्याच्या दृष्टीने उत्खनन, जतन आणि संवर्धन हे महत्त्वाचे टप्पे मानले जातात.

रायगडावर सर्वाधिक बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात झालं होतं, असं पुरातत्व तज्ज्ञ मानतात.रायगडावर सुरु असलेलं उत्खनन आणि संवर्धनाचं काम पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या टीमने फेब्रुवारी 2022 मध्ये भेट दिली होती.

एरिअल सर्व्हेमध्ये पूर्वी असे वाडे होते याचे अवशेष दिसले आहेत. त्यातल्या 6 वाड्यांचं उत्खनन पुरातत्व खात्याने केलंय. उरलेले वाडे अजूनही प्रकाशझोतात यायची वाट पाहतायत.

बीबीसी मराठीची टीम तीन दिवस रायगडावर फिरून तज्ज्ञांकडून या कामांची माहिती समजून घेत होती.

रायगड किल्ल्यावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होतंय. गेली तीन वर्षं हे उत्खनन सुरू आहे. गेली अनेक शतकं मातीच्या आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली दडलेला रायगडचा नवा इतिहास त्यामुळे प्रकाशात येऊ शकेल. रायगडावरचा संपूर्ण परिसर साधारण बाराशे एकर इतका आहे.
Shivaji_Maharaj_Raigad.jpg

Coin Marketplace

STEEM 0.16
TRX 0.25
JST 0.034
BTC 95670.34
ETH 2679.38
SBD 0.69