बिझनेस का प्रोफेशन?

in #ok5 years ago (edited)

काल सहज एक लेख वाचत होतो त्यात ऊबरच्या धंद्याबद्दल माहिती होती म्हणून थोडं गुगल केलं, मराठीतून तर काही महत्वाच्या टीप्स सापडल्या, म्हणजे विक्री हे तत्व जर अंगी भिनल तर कोणताच उद्योग अवघड नाही.

709DB647-00B1-46B7-9FEF-4C139934615A.jpeg

उद्योगाची निवड हि बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकलेला असेल तर इमारत कोसळणारच असते. असच काही उद्योगाच्या बाबतीतही घडत असतं. शेजारच्या कुणाचा तरी उद्योग यशस्वी झालाय म्हणून आपणही तो उद्योग करावा, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून आली म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा, किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे, किंवा कुणीतरी अमुक तमुक व्यवसाय कर त्यात खूप पैसा आहे असे सांगतोय म्हणून तोच व्यवसाय करावा अशा प्रकारे व्यवसाय निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत दिसून येते.

यातच ग्रामीण भागातील व्यवसाय म्हटले कि डाळ मिल, मसाले, पापड, लोणचे उत्पादन इतकेच व्यवसाय सुचतात. त्यापलीकडेही शेकडो व्यवसाय आहे हे आपल्या गावीही नाही. जो तो उठतो तेच तेच व्यवसाय सुरु करतोय. यामुळे व्यवसाय क्षेत्रात एक प्रकारचे व्यवसायाचे डबके तयार झालेले आहे. या वैचारिक डबक्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. योग्य व्यवसाय निवडणे आवश्यक झाले आहे.

व्यवसाय निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना कि इतरांनी काय केलंय, किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठीच असतो, आणि प्रत्येक व्यवसायात भरपूर पैसे मिळत असतो. त्यामुळे व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्वाचे असते.
मराठीतील स्टार्टअप या विषयातील तज्ञ मयूर जोशी त्यांच्या संकेतस्थलावर लिहतात की आपण जे करणार ते नावीन्यपूर्ण आहे का आणि नसेल तर त्यात पूर्वसुरींपेक्षा वेगळे काय असेल जेणेकरून ग्राहक आपल्याकडे वळतील, याचा निश्चित विचार व्हायला हवा.

Sort:  

Hi @coffeelovers,
I'm glad that you were able to recover you account and I was able to protect your funds in time.

Please consider delegating to @keys-defender to keep my service active and support my initiative.

Take care!   =}

Coin Marketplace

STEEM 0.21
TRX 0.26
JST 0.040
BTC 101903.07
ETH 3676.99
USDT 1.00
SBD 3.21