Call Center Fraud exposed

in #fraud7 years ago

ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणामुळे भारतीय कॉल सेंटर उद्योगातील घोटाळा उघडकीस आला आहे, असे अमेरिकेचे ॲटर्नी जनरल जेफ सेशन यांनी म्हटले आहे.
9DCAF5F3-9A7D-44D3-A3E8-C1B3345E343E.jpeg
दोषींनी शिक्षा भोगल्यानंतर त्यांना भारतात परत पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील नागरिकांची कॉल सेंटरच्या माध्यमातून मोठी फसवणूक झाली आहे. विशेषतः भारतातील कॉल सेंटरनी अमेरिकेतील जेष्ठ नागरिक आणि कायदेशीर स्थलांतरितांना फसविले आहे. फोनवरून अनेक योजनांचे आमिष दाखवून लोकांना गंडा घातला आहे. कॉल सेंटरचे ऑपरेटर्स अमेरिकेतील लोकांना फोन करून पैसे भरा; अन्यथा सरकार तुम्हाला अटक करून दंड अथवा शिक्षा सुनावेल. तसेच तुम्हाला तुमच्या देशात पाठवून दिले जाईल, अशा धमक्या देत होते. यामुळे लोक भितीने पेमेंट करत होते. धमक्या देऊन लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकारे अनेक दिवस चालू होते. मात्र या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला.

Coin Marketplace

STEEM 0.17
TRX 0.23
JST 0.033
BTC 96086.25
ETH 2615.46
USDT 1.00
SBD 2.59